Bharat Biotech COVAXIN | भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला परवानगी

Continues below advertisement

भारतीयांना कोरोनावर ३ स्वदेशी लसींचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. सीरमच्या ‘कोविशिल्ड’नंतर देशाला आता भारत बायोटेकनं बनवलेली पहिली स्वदेशी लस ‘कोवॅक्सिन’ लवकरच उपलब्ध होणार आहे. केंद्रीय औषधं मानक नियंत्रण संघटनेच्या विशेषज्ज्ञांच्या समितीने ‘कोवॅक्सिन’  लसीच्या आपत्कालिन वापराच्या मंजुरीसाठी शिफारस केली आहे.तर अहमदाबादेतील कॅडिला लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी शिफारस करण्यात आलीए. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीयांना ३ लसींचा पर्याय उपलब्ध होऊ शकतात. ऑक्सफर्डची कोविशिल्ड लस पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये तयार होतेय. तर हैदराबादेत पूर्णतः भारतीय बनावटीची भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन तयार झाली तर कॅडिला लसीची अहमदाबादेत निर्मित होत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram