Bihar Mahagathbandhan : बिहारमध्ये महागठबंधन तुटण्याची शक्यता
Bihar Mahagathbandhan : बिहारमध्ये महागठबंधन तुटण्याची शक्यता बिहारमध्ये काँग्रेस आणि राजद यांचं महागठबंधन तुटण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांची जागावाटपाची बोलणी फिस्कटल्याची स्थिती आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील अशी शक्यता आहे. बिहारमध्ये जेडीयूला सोडचिठ्ठी देत राजदमध्ये आमदार बिमा भारती दाखल झाल्या आहेत. पप्पू यादव यांचा दावा असलेल्या पूर्णिया मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचसोबत काँग्रेसला ५ ते ६ जागांहून अधिक जागा सोडण्यास राजद तयार नाही. त्यामुळे काँग्रेस नाराज आहे. राजद विविध जागांवर परस्पर उमेदवारी जाहीर करत आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची फसवलं गेल्याची भावना आहे. त्यामुळे हे महागठबंधन तुटण्याची शक्यता आहे. पप्पू यादव यांनी पूर्णियाऐवजी मधेपुरातून लढावं असा आग्रह राजद लावून आहे. त्यामुळे नाराजी आहे.