Monsoon 2022 : पावसाचा उत्तर भारतात हाहकार, भूस्खलनामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला

 ओडिशावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे शेजारील बिहारमध्ये पाऊस कहर बनून कोसळतोय... बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीच्या पुरामुळे हाहाकार उडालाय...  गंगेच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे गंगेची उपनदी असलेल्या सुगवा नदीलाही मोठा पूर आला... त्यामुळे भागलपूरच्या रोहतास गावात अनेक कावडिया यामध्ये अडकले होते.. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं धोका वाढला होता..  एनडीआरएफच्या मदतीनं या कावडियांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं... गंगा नदीच्या पुरामुळे अनेक ठिकाणी घरांनाही फटका बसलाय... गंगा नदी पात्राबाहेर वाहत असल्यानं अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola