Bihar Election Results 2020 | बिहार विधानसभा निवडणूक निकालांवर राजकीय अभ्यासकांचं विश्लेषण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Nov 2020 08:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदार पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रात 414 हॉल बनवले आहेत. या सर्व केंद्रांवर आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी होईल. यानंतर ईव्हीएम मतं मोजली जातील. नऊ वाजता पहिले कल हाती येण्याची शक्यता आहे. तर दुपारपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होईल, असं म्हटलं जात आहेत. नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल.