PM Modi | Bihar Election 2020 | बिहारमध्ये पुन्हा एनडीए सरकार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास

Continues below advertisement

वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मातृभाषेतून शिकवण्याचा निर्णय घेणार, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील पहिल्या प्रचारसभेत केली. तसंच बिहारमध्ये एनडीएचंच सरकार येणार अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी आज बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएच्या प्रचाराला सुरुवात केली. सासाराममध्ये त्यांची पहिली सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमारही सभेत उपस्थित होते. मोदींनी भोजपुरीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी दिवंगत रामविलास पासवान यांना श्रद्धांजलीही वाहिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "देशाच्या शिक्षणव्यवस्थेत बिहारचा इतिहास गौरवशाली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणातून प्रेरणा घेऊन आता वैद्यकीय, अभियांत्रिकीसह सर्व तांत्रिक अभ्यासक्रमही मातृभाषेत शिकवण्याचा प्रयत्न असेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram