Bihar CBI Raids : बिहारमध्ये बहुमत चाचणीआधी RJDच्या नेत्यांवर छापे, पाहा कोण आहेत रडारवर

बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आता लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या चार नेत्यांवर सीबीआनं कारवाई सुरू केलीय. राजद नेते सुनील सिंह यांच्या घरी सीबीआयनं छापेमारी सुरु केलीय. तर राजद खासदार फैयाज अहमद आणि अश्फाक करीम यांच्या घरीही सीबीआयनं छापा टाकलाय. याशिवाय राजदचे माजी आमदार सुबोध राय यांच्या घरावरही सीबीआयनं छापा टाकलाय. बिहारमध्ये बहुमत चाचणीच्या आधी ही छापेमारी सुरु झालीय. सुनील सिंह हे राष्ट्रीय जनता दलाचे विधान परिषद आमदार आणि कोषाध्यक्षही आहेत. जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्यात ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola