Bhupendra Patel takes oath as new Gujarat CM : भूपेंद्र पटेल गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री
गुजरातच्या नवीन मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या नवीन मुख्यमंत्र्यांसाठी नितीन पटेल, मनसुख मांडवीया आणि पुरुषोत्तम रुपाला या तीन नेत्यांची नाव सर्वाधिक चर्चेत होती. मात्र नेहमीप्रमाणे भाजपने पुन्हा आश्चर्यचा धक्का देत मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या हाती गुजरातची कमान दिली. भूपेंद्र पटेल संध्याकाळी 5.30 वाजता राज्यपालांना भेटायला जातील. दुसरीकडे, भूपेंद्र पटेल यांच्यासह 15 मंत्री आज शपथ घेणार आहेत.