Bhopal : 72 तासांची भू-समाधी घेणारे बाबा पुरुषोत्तमानंद बाहेर ABP Majha

मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये ३० सप्टेंबरपासून ७२ तासांची भू-समाधी घेणारे बाबा पुरुषोत्तमानंद आज सकाळी अकराच्या सुमारास बाहेर येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा तैनात केलीय.. सात फूट खोल अशा खड्ड्यात बाबा पुरुषोत्तमानंद यांनी समाधी घेतलीय.. सुरुवातीला बाबा पुरुषोत्तमानंद यांना भू-समाधीसाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र शपथपत्र दिल्यानंतर ३० सप्टेंबरला बाबा पुरुषोत्तमानंद खड्ड्यात समाधीसाठी उतरले.. त्यानंतर या खड्ड्याला लाकडी पाटी आणि माती टाकून झाकण्यात आलंय.. बाबा देवीभक्त असून भाविकांना चमत्कार दाखवण्यासाठी समाधी घेतल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय.. दरम्यान बाबा पुरुषोत्तमानंद यांनी समाधी घेतल्याचं समजताच या ठिकाणी भाविकांची गर्दी झालीय.. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola