Bholebaba Hathras : हाथरसमध्ये नेमकं चेंगराचेगरी का झाली ?

Continues below advertisement

Bholebaba Hathras : हाथरसमध्ये नेमकं चेंगराचेगरी का झाली ? उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. रतिभानपूर इथे आयोजित स्वयंभू संत भोले बाबा यांच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे आतापर्यंत 116 जणांचा मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. तर आतापर्यंत मृतांचा आकडा 116 वर पोहोचला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढवण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.हाथरसमध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या समोर आलेल्या फोटोंनी केवळ उत्तर प्रदेश नव्हे, तर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. घटनास्थळी पडलेला मृतदेहांचा ढीग अपघाताची भीषणता सांगत होता. हॉस्पिटल आणि पोस्टमॉर्टम हाऊसमधील आरडाओरडा काळीज पिळवटणारा होता. हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव भागात ही घटना घडली. भोले बाबांच्या सत्संगासाठी ही अलोट गर्दी झाली होती. पण सत्संग संपल्यानंतर उन्हात बसलेल्या लोकांनी घरी परतण्यासाठी गर्दी केली. यानंतरचं दृश्य खूपच भयावह होतं. लोक एकमेकांना तुडवून जात होते. एकमेकांवर पडत होते.अपघातानंतर मृतदेह, जखमींना ट्रक आणि इतर वाहनांमध्ये भरून सिकंदरौ ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं. इतके मृतदेह होते की, शवाघर पूर्ण भरुन गेलं होतं. अखेर रुग्णालयाबाहेरच्या आवारात मृतदेह ठेवण्यात आले. तिथेच नातेवाईकांनी गर्दी केली होती. काही मृतदेहांची ओळख पटली होती, तर काहींची ओळख अद्याप पटलेली नव्हती. तिथेच पडलेल्या मृतदेहांच्या ढिगात जमलेल्या नातेवाईकांकडून आपल्या आप्तेष्ठांचा शोध सुरू होता. तर आपल्या जवळच्यांना गमावलेल्या दुःखानं आक्रोश ऐकू येत होता. हाथरसमधील या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. ट्रकमध्ये मृतदेह ठेवले होते. तिथे बसून एक महिला रडत होती. दुसऱ्या एका फोटोमध्ये एक महिला आणि एक पुरुष दुसऱ्या वाहानात बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला.अपघाताचा साक्षीदार असलेल्या एका महिलेनं सांगितलं की, सत्संग संपल्यानंतर लोक घटनास्थळावरुन बाहेर पडत होते. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. लोक एकमेकांना तुडवून पुढे जात होते. सिकंदरराव पोलीस स्टेशनचे एसएचओ आशिष कुमार यांनी सांगितलं की, प्रचंड गर्दीमुळे हा प्रकार घडला. सिकंदररावचे आमदार वीरेंद्र सिंह राणा म्हणाले की, हा एक दिवसाचा सत्संग होता आणि मंगळवारी सकाळी त्याची सुरुवात झाली.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मदतकार्याला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांनी आग्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अलिगढचे आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केलं आणि तपासाच्या सूचना दिल्या.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram