
BharatPe : वैयक्तिक गरजांसाठी कंपनीचा निधी वापरल्यानं संस्थापकाच्या पत्नीची कंपनीतून हकालपट्टी
Continues below advertisement
भारतपे या प्रसिद्ध फिनटेक कंपनीचे सह संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांची पत्नी माधुरी ग्रोव्हर यांची कंपनीतून हाकालपट्टी करण्यात आलेय. एवढंच नाही तर त्यांच्याकडे असलेले कंपनीचे शेअर्सही काढून घेण्यात आलेत. माधुरी ग्रोव्हर यांनी वैयक्तिक सौंदर्योपचार, खरेदी, प्रवास यासाठी कंपनीचा निधी वापरला आणि त्याच्या खोट्या पावत्या सादर केल्या असा आरोप करण्यात आलाय. गेले काही दिवसांपासून एका बहिस्थ कंपनीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू होती अखेर या कंपनीच्या निर्णयानुसार माधुरी ग्रोव्हर यांची हाकालपट्टी करण्यात आलेय.
Continues below advertisement