Covaxine | भारतातीय कोविड-19 लस 'Covaxin'ला क्लिनिकल ट्रायलची परवानगी
Continues below advertisement
कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. अशातच जगभरातील अनेक वैज्ञानिक या व्हायरसवर प्रतिबंध घालण्यासाठी लस शोधण्याचा प्रयत्नात आहेत. अशातच भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. भारतात कोरोनावर लस शोधण्यात येत असून भारतीय औषधि महानियंत्रक (डीसीजीआय) ने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. 'कोवॅक्सिन' नावाची लस भारत बायोटेकने इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)सोबत एकत्र येऊन तयार केली आहे.
Continues below advertisement