RBI on 2000 Note : चलनातून गुलाबी रंग जाणार, केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांची प्रतिक्रीया

2000 Note:  भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने (RBI) बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आहे. 
केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांनी  यासंदर्भात आपली  प्रतिक्रीया दिलीय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola