Rameshwaram Cafe Blast :बंगळूरमधील रामेश्वरम कॅफेत बाॅम्बस्फोट, एका संशयिताची पोलिसांकडून चौकशी सुरू

Rameshwaram Cafe Explosion : बंगळूरमधील रामेश्वरम कॅफेमध्ये (Rameshwaram Cafe Explosion) आज (1 मार्च) झालेल्या स्फोटाची दृश्ये कॅफेमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. रामेश्वरम कॅफे हे लोकप्रिय हँगआउट्सपैकी एक आहे. दुपारच्या वेळी याठिकाणी खूप गर्दी असते. कर्नाटकचे पोलीस महासंचालक आलोक मोहन यांनी सांगितले की, स्फोटात नऊ जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तपास सुरू असून आम्हाला एफएसएल टीमकडून अहवाल मिळाल्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ, असेही ते म्हणाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola