Belgaum Border Dispute | बेळगावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन | ABP Majha

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांनी कन्नड ध्वजाचे दहन केल्याचे पडसाद बेळगावात उमटले. दोन दिवसांपूर्वी भीमाशंकर पाटील या कन्नड संघटनेच्या पदाधिकाऱ्याने समिती नेत्याविषयी वक्तव्य केले होते. त्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शनिवारी आंदोलन केले. त्याची बातमी बेळगावात पोचल्यावर कन्नड संघटनांनी एकत्र येऊन सर्किट हाऊस परिसरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola