Beer in J&K General Stores : जम्मू काश्मीरमध्ये किराणा मालाच्या दुकानात मिळणार बिअर,निर्णयाला मंजुरी
Continues below advertisement
महाराष्ट्रात मॉलमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावरून मतमतांतरं सुरु असताना तिकडे जम्मू काश्मीरमध्ये मात्र किराणा मालाच्या दुकानात बिअर मिळणार आहे. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या निर्णयाला मंजुरील दिलीय. जम्मू काश्मीरच्या शहरी भागातील अधिकृत डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये बिअर विक्रीला परवानगी देण्यात आलीय. शहरी भागातील अधिकृत डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये बिअर आणि रेडी टू ड्रिंक प्रकारातील शीतपेयेदेखिल उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी व्यावसायिक संकुलातील 1200 चौरस फूट जागेचा गाळा आणि वार्षिक 5 कोटी रुपयांचं उत्पन्न अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत.
Continues below advertisement