AERO INDIA 2021 | बंगळुरुमध्ये 'एअरो 2021' ला सुरुवात, तेजस विमानासाठी 48 हजार कोटींचा करार
संरक्षण दलाचे सर्वात मोठे 13 वे प्रदर्शन आज होत आहे. बंगळुरुमध्ये फेब्रुवारी महिन्यात 3 ते 5 तारखेच्या दरम्यान संरक्षण दलाचे (Defence) सर्वात मोठे प्रदर्शन 'एअरो इंडिया शो' (Aero India) आयोजित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या वर्षी सुर्यकिरण आणि सारंग एरोबेटिक डिस्प्ले एकसोबत होणार आहेत. संरक्षण दलाचे हे सर्वात मोठे प्रदर्शन असून ते दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येतं.