Mamata Banerjee letter : विरोधी पक्षनेते आणि गैरभाजप मुख्यमंत्र्यांना खुलं पत्र, एकत्र येण्याचं आवाहन
Continues below advertisement
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि गैरभाजप राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांना खुलं पत्र लिहिलंय. भाजपविरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन ममता यांनी या पत्रातून केलंय. भाजपाकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय. केंद्र सरकार सूडाचं राजकारण करत असून यासाठी सीबीआय, ईडी, आयबी, आयकर विभागासह सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करतंय. ही बाब लोकशाहीसाठी ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचं बॅनर्जी यांनी पत्रात नमूद केलंय.
Continues below advertisement