Babri Masjid verdict | भारतात न्याय मिळणं कठीण : मुस्लिम नेते गुलजार आजमी
Continues below advertisement
1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लागला. या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी मशिद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला आहे. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हटलं आहे. लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. ही घटना अचानक घडली असं देखील कोर्टानं म्हटलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Gulzar Azmi Muslim Leader Gulzar Azmi Reaction Babri Mosque Ram Temple Supreme Court Babri Masjid Ayodhya Babri Masjid Demolish Babri Masjid Demolition Case CBI Court Ayodhya Babri Masjid Case Babri Masjid Verdict Uttar Pradesh