Baba Ramdeo On Yoga Day: योगाला 5 हजार वर्षांचा इतिहास; योग गुरू बाबा रामदेव यांच्याशी खास बातचीत
Baba Ramdeo On Yoga Day: योगाला 5 हजार वर्षांचा इतिहास; योग गुरू बाबा रामदेव यांच्याशी खास बातचीत
हेही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे सध्या अमेरिकेच्या (America) दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींचा 24 जूनपर्यंत अमेरिका दौरा असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान बुधवारी (21 जून) न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनमध्ये अनेक कार्यक्रम आखण्यात आले आहेत. UN च्या मुख्यालयात 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे पंतप्रधान मोदी नेतृत्व करतील. यासह पंतप्रधान मोदी आज खालील कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहेत. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये पंतप्रधान मोदी पोहोचतील. नॅशनल सायन्स फाऊंडेशनमध्ये 'स्किलिंग फॉर फ्युचर इव्हेंट'मध्ये मोदी उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी - जिल बिडेन यांची मोदी भेट घेतील आणि 'नॅशनल सायन्स फाऊंडेशन'ला देखील ते भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनमधील एका बिझनेस मीटिंगला उपस्थित राहणार आहेत. यूएस फर्स्ट लेडी - जिल बिडेन यांच्यासह स्टेट डिनरसाठी मोदी जातील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन हे पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत करतील. व्हाईट हाऊसमध्ये मोदींच्या खासगी भेटी होतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल या मोदींना व्हाईट हाऊसमध्ये डिनरसाठी होस्ट करतील.