Baba Ka Dhaba : दिल्लीतील प्रसिद्ध 'बाबा का ढाबा' चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न
Continues below advertisement
नवी दिल्ली : झोपेच्या गोळ्या खाल्ल्यानंतर 'बाबा का धाबा' चालवणाऱ्या कांता प्रसाद यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना गंभीर अवस्थेत सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक चौकशीत बाबांनी झोपण्याच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिस सूत्रांनी असेही सांगितले की, कांता प्रसाद यांच्या पत्नीने सांगितले आहे की डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी रेस्टॉरंट उघडले होते, मात्र ते फारसे चालले नाही आणि त्यात त्यांचे बरेच नुकसान झाले.
Continues below advertisement