
Bal Thakur: सुप्रसिद्ध चित्रकार बाळ ठाकूर यांचं निधन ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रातील प्रख्यात चित्रकार बाळ ठाकूर यांचे आज सकाळी कोकणातील त्यांच्या राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. भालचंद्र शिवराम ठाकूर असे त्यांचे पूर्ण नाव होते. २४ एप्रिल १९३० ला कोकणातील लांजा तालुक्यातील भांबेड येथे त्यांचा जन्म झाला होता. जेजे स्कूल ऑफ आर्टमधून १९४८ मध्ये त्यांनी पदवी घेतली होती. मराठी पुस्तकांचे मुखपृष्ठकार आणि सजावटकार म्हणून ते अधिक परिचित होते. अनेक मोठ्या साहित्यिकांच्या साहित्य कलाकृतीसाठी त्यांनी मुखपृष्ठे तयार केलेली होती. मुखपृष्ठे करताना काही काळ रंगीत पेपर वर त्यांनी स्क्रीन प्रिंटिंगचा वापर करून वेगळा दृश्य अनुभव देणारी मुखपृष्ठे तयार केली होती. लक्ष्मीबाई टिळकांपासून ते बालकवी, मर्ढेकर ते बा. भ. बोरकरांपर्यंत अनेक साहित्यिकांची व्यक्तिचित्रेही त्यांनी काढलेली होती.
Continues below advertisement