Ram Temple Bhoomi Pujan | अयोध्येतील पुजाऱ्यासह 16 पोलिसांना कोरोनाची लागण
ऐतिहासिक राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी अयोध्येला पोहोचणार आहेत. या कार्यक्रमाला 200 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी साधू, संत, अधिकारी, नेता, विहिप- न्यास यांच्या व्यतिरिक्त देशातील 50 विशेष अतिथी सहभागी होणार आहेत. मात्र याआधी एक चिंता वाढवणारी गोष्ट समोर आली आहे. भूमिपूजनाच्या तयारीच्या गडबडीत याठिकाणी कोरोनाची एंट्री झाली आहे. राम जन्मभूमीचे पुजारी प्रदीप दास (Priest Pradeep Das) यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. ते मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत. प्रदीप दास देखील सत्येंद्र दास यांच्यासह राम जन्मभूमीची पूजा करतात. राम जन्मभूमीमध्ये मुख्य पुजाऱ्यांसह अन्य चार पुजारी रामललाची सेवा करतात.