Ayodhya Ram Mandir :  पंतप्रधान मोदींच्या आगमनाआधी अयोध्येत चोख बंदोबस्त रामपथावरून आढावा

Continues below advertisement

Ayodhya Ram Mandir :  पंतप्रधान मोदींच्या आगमनाआधी अयोध्येत चोख बंदोबस्त रामपथावरून आढावा 
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पडणार आहे.  रामाची जुनी मूर्ती राममंदिरात आणण्यात आली. गाभाऱ्याचे द्वार खुले करण्यात आले आहे.  दरम्यान राममंदिर परिसरात चैतन्याचं आनंदाचं वातावरण आहे. अयोध्येत सध्या रामनामाचा अखंड जप सुरू आहे. कारण सर्वांच्या लाडक्या रामरायाची आज प्राणप्रतिष्ठा होणार आहे.  12 वाजून 29  मिनिटांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि ज्या मंदिरात हा महामंगल सोहळा संपन्न होणार आहे.  त्या नव्याकोऱ्या मंदिरालाही सजावटीचा साज बहाल झालाय. राम मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर आकर्षक फुलांची सजावट केली गेलीय. तर बाहेरही आकर्षक रोषणाई करण्यात आलीय.. या सोहळ्याला अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीने वातावरण राममय झालंय. परंतु राम मंदिराच्या उद्घाटनानंतर तुमच्या आमच्या मनात अनेक प्रश्न असतील तर आज आम्ही तुम्हाला तुमच्या मनातील 22 प्रश्नांची उत्तरे देणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram