Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी कोठारी बंधूंचं स्मरण ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAyodhya Ram Mandir : राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी कोठारी बंधूंचं स्मरण ABP Majha
एकाच घरातून दोन सख्खे भाऊ कारसेवा करताना आपल्या प्राणांना मुकले होते... या कोठारी बंधूंच्या स्मरणार्थ आरती केली जातेय.
याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पडणार आहे. रामाची जुनी मूर्ती राममंदिरात आणण्यात आली. गाभाऱ्याचे द्वार खुले करण्यात आले आहे. दरम्यान राममंदिर परिसरात चैतन्याचं आनंदाचं वातावरण आहे. अयोध्येत सध्या रामनामाचा अखंड जप सुरू आहे. कारण सर्वांच्या लाडक्या रामरायाची आज प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 12 वाजून 29 मिनिटांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि ज्या मंदिरात हा महामंगल सोहळा संपन्न होणार आहे. त्या नव्याकोऱ्या मंदिरालाही सजावटीचा साज बहाल झालाय. राम मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर आकर्षक फुलांची सजावट केली गेलीय. तर बाहेरही आकर्षक रोषणाई करण्यात आलीय.. या सोहळ्याला अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीने वातावरण राममय झालंय. परंतु राम मंदिराच्या उद्घाटनानंतर तुमच्या आमच्या मनात अनेक प्रश्न असतील तर आज आम्ही तुम्हाला तुमच्या मनातील 22 प्रश्नांची उत्तरे देणार आहे.