Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी होणार प्राणप्रतिष्ठा ABP Majha
सर्वांनाच उत्सुकता असलेलं अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्टापणेसंदर्भातली.
प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर अयोध्यामध्ये उभं राहातंय. या मंदिराचं काम सध्या अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झालंय. त्यामुळे पुढच्या वर्षी हे मंदिर भाविकांसाठी खुलं होणार आहे. 'राम मंदिराच्या तीन मजल्यांचं सध्या काम सुरू आहे. तळमजल्याचं काम डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. अशी माहिती मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिलीय. तसंच यो सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहाणार आहेत.