Ayodhya Ram Mandir : देशभरातील 140 महंतांमध्ये समावेश झालेले Nashik Sudhir Das Maharaj 'माझा'वर

प्रभू श्रीराम आणि महाराष्ट्राचं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं आहे. आणि या नात्याची वीण गुंफली गेलीय नाशकात... १४ वर्षांचा वनवास भोगत असताना श्रीराम काही काळ नाशिकच्या पंचवटी भागात वास्तव्यास होते. विशेष म्हणजे, ज्या भागात प्रभू श्रीरामांनी पर्णकुटी उभारली होती, त्याच जागेवर नंतर काळाराम मंदिराची उभारणी झालीय. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतलं काळाराम मंदिर कायमच भक्तांनी फुललेलं असतं. याच मंदिराचे प्रमुख महंत महामंडलेश्वर सुधीरदास महाराज सध्या अयोध्येत आहेत. देशभरातील जे १४० महंत प्रभू रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार आहेत, त्यामध्ये सुधीरदास महाराजांचा समावेश आहे. याच सुधीरदास महारांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी... पाहूयात..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola