Ayodhya Ram Mandir : अयोध्येसाठी 19 जानेवारी 2024 पासून 1000हून अधिक गाड्या धावणार
Ayodhya Ram Mandir : अयोध्येसाठी 19 जानेवारी 2024 पासून 1000हून अधिक गाड्या धावणार राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघा एक महिना उरलाय. राममंदिराच्या या दैदिप्यमान सोहळ्याची तयारीही जोरदार सध्या सुरुये. अशातच रेल्वेने रामभक्तांना मोठी भेट दिली आहे. नव्याने बांधलेल्या राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी , रेल्वेने देशाच्या विविध भागांतून अयोध्येला जाणाऱ्या 1,000 हून अधिक गाड्या धावणार असल्याची घोषणा केलीय. प्रभू रामाच्या मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर 23 जानेवारी 2024 पासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे. या गाड्यांद्वारे राम नगरी अयोध्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, पुणे, कोलकाता, नागपूर, लखनौ आणि जम्मूसह अनेक प्रमुख शहरांशी जोडली जाईल, त्यामुळे भाविकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. 19 जानेवारीपासून या गाड्या धावणार आहेत. तसंच प्रवाशांची संख्या वाढल्यास गाड्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असंही सांगण्यात येतंय.