Ayodhya Ram Mandir : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या सज्ज, अयोध्येतून थेट आढावा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAyodhya Ram Mandir : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या सज्ज, अयोध्येतून थेट आढावा
उद्या अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त सुरक्षा यंत्रणा सज्ज असून, संपूर्ण अयोध्येला छावणीचं स्वरुप आलंय. अयोध्येतील सुरक्षेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी..
Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये भव्य प्रभू श्रीराम मंदिरात (Ram Temple) रामललाच्या (Ram Lalla) अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha ) कार्यक्रमाला आता फक्त एक दिवस उरला आहे. याआधी राम मंदिरात (Ram Temple) विशेष विधी सुरू आहेत. आज राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंबंधित विधींचा सहावा दिवस आहे. आज रविवारी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला 114 कलशांच्या पाण्याने स्नान घालण्यात येणार आहे. आज रामललाच्या मंडपाचीही पूजा केली जाणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.