Ayodhya LIVE Painting Exhibitiion:अयोध्येत देशभरातील कलाकारांनी साकारली प्रभू श्री रामांची प्रतिकृती
Continues below advertisement
Ayodhya LIVE Painting Exhibitiion:अयोध्येत देशभरातील कलाकारांनी साकारली प्रभू श्री रामांची प्रतिकृती सध्या आपण जे रामायण ऐकतो, बघतो ते तुलसीदास रचित रामायण आहे. महर्षी वाल्मीकांपासून प्रेरणा घेऊन तुलसीदासांनी पद्यरूपी दोहा व चौपाईच्या माध्यमातून रामायणाची रचना केली. तुलसीदास रामायणात एक दोहा किंवा चौदापाई मध्ये रामायणातील एका घटनाक्रमाचा उल्लेख सापडतो. नागपूरचे जेष्ठ चित्र सुभाष सिंग चंदेल यांनी याच दोह्यांना चित्रात उतरवले व चित्ररुपी रामायणाची मांडणी केली. 1998 पासून ते तुलसीदासांच्या दोह्यांवर चित्र काढत आहे. रामायणातील एका घटनेचे एक चित्र साकारायला त्यांना काही महिने लागतात. आतापर्यंत शंभरच्या वर दोह्यांना आपल्या चित्रात उतरवले आहे. त्यांच्या या दोहा रुपी चित्रांना समझून घेत त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
Continues below advertisement