Ayodhya Shri Ram Mandir : महाराष्ट्रातून निमंत्रित संत-महंत दर्शनासाठी अयोध्येत, जय श्रीरामाचा जयघोष
अयोध्येत सध्या रामनामाचा अखंड जप सुरू आहे. कारण सर्वांच्या लाडक्या रामरायाची आज प्राणप्रतिष्ठा होणारेय. आज १२ वाजून २९ मिनिटांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणारे.. आणि ज्या मंदिरात हा महन्मंगल सोहळा संपन्न होणारेय. त्या नव्याकोऱ्या मंदिरालाही सजावटीचा साज बहाल झालाय. राम मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोनावर आकर्षक फुलांची सजावट केली गेलीय. तर बाहेरही आकर्षक रोषणाई करण्यात आलीय.. या सोहळ्याला अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीने वातावरण राममय झालंय