Auraiya Accident | उत्तर प्रदेशातील औरैयात प्रवासी मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात; 24 मजुरांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उत्तर प्रदेशमधील औरैयामधून गावी परतणाऱ्या मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रक एकमेकांसमोर आल्याने हा अपघात घडला. दोन ट्रक एकमेकांसमोर येऊन धडक झाली. या अपघातात 24 मजुरांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात कोतवाली परिसरातील मिहौली राष्ट्रीय महामार्गावर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये असलेले सर्व मजूर दिल्लीहून गोरखपूरला जात होते.