Atmanirbhar Bharat| Rajnath Singh| केंद्रीची मोठी घोषणा, संरक्षण मंत्रालयाकडून 101 वस्तूंवर आयातबंदी
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत 101 हून अधिक वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाने 101 वस्तूंची यादी तयार केली आहे, ज्यांवर आयातबंदी असेल. मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटरवर याबाबत घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' बनवण्याच्या आवाहनानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
Tags :
Defence Items Embargo On Imports MoD PM Modi Atmanirbhar Bharat Defence Ministry Rajnath Singh