Assembly Election 2022 : गोवा आणि उत्तराखंडमध्ये सर्व जागांसाठी आज मतदान ABP Majha

गोवा विधानसभेच्या ४० आणि उत्तराखंड विधानसभेसाठी ७० जागांसाठी आज मतदान होतंय. यासोबतच उत्तर प्रदेशातही आज दुसऱ्या टप्प्यातील ५५ जागांसाठी मतदान होतंय. गोवा आणि उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडतंय. तर यूपीतील सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बुदौन, बरेली आणि शाहजहानपूर या 9 जिल्ह्यांतील 55 जागांसाठी मतदान होतंय... आजच्या मतदानात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तर, या तिनही राज्यांमध्ये सत्ता टिकवण्याचं आवाहन भाजपसमोर आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola