Assassins of Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या सहाही मारेकऱ्यांची होणार सुटका

Continues below advertisement

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन सह सर्व सहा दोषींची सुटका करण्याचे आदेश आज  सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये एस नलिनी, आरपी रविचंद्रन यांच्यासह संथन, मुरुगन, रॉबर्ट पायास, जयकुमार यांचा समावेश आहे. या प्रकरणातील सातवा दोषी एजी पेरारिवालन याची याआधीच सुटका करण्यात आलेली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची LTTE संघटनेने तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे आत्मघाती बॉम्बहल्ल्याच्या मदतीने २१ मे १९९१ रोजी हत्या केली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram