Assam Flood : आसाममध्ये आभाळ फाटलं; मुसळधार पाऊस, पुराचा हाहाकार ABP Majha

एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना आसामला मात्र मुसळधार पावसान अक्षरश: झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळं रूळ वाहून गेले आणि रेल्वे उलटल्याचंही चित्र पाहायला मिळालं. ५७ हजार लोकांना या पावसाचा फटका बसलाय. आतापर्यंत तीन लोकांचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे त्रिपुरा, मिझोरम आणि दक्षिण आसामशी जोडलेल्या २५ पेक्षा अधिक रेल्वे गाड्या भूस्खलनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. या पुराचा सर्वाधिक फटका कछार भागात बसला आहे. जिल्ह्यात निमलष्करी दल, अग्निशमन, आपत्कालीन सेवा,आणि एसडीआरएफ जवानांना २हजार२०० जणांना वाचवण्यात यश आलंय.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola