Ashok Stambh National Emblem : कसं तयार झालं संसद भवनावरील अशोकस्तंभ? जाणून घ्या रंजक कहाणी
abp majha web team
Updated at:
14 Jul 2022 03:19 PM (IST)
National Emblem : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 जुलै रोजी नवीन संसदेच्या इमारतीवरील राष्ट्रीय प्रतिक अशोक स्तंभाचे (National Emblem Ashok Stambh) अनावरण करण्यात आले. मात्र, या अशोक स्तंभावर असलेल्या सिंहाच्या चेहऱ्यावरील भावमुद्रेवरून (Ashok Stambh) वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर अशोक स्तंभावरून टीकेची झोड उठवली जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.