Lakhimpur : लखीमपूर खेरी प्रकरणात आशिष मिश्रावर हत्येचा गुन्हा
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात लखीमपूर खेरी मध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं. यावेळी एका भरधाव गाडीने शेतकऱ्यांना चिरडलं. आता हा सगळा प्रकार एका पूर्वनियोजीत कटाचा भाग असल्याचं विशेष तपास पथकाने म्हटलंय. या घटनेतील मुख्य आरोपी हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा आहे. त्याच्यावर आता नव्याने कलमं लावण्यासाठी एसआयटीने न्यायालयाला पत्र लिहीलंय. तसच मंत्री महोदयांच्याही हकालपट्टीची मागणी केली जातेय... पाहूयात यासंदर्भातला एबीपी माझा हा रिपोर्ट...