Asani Cyclone अंदमान निकोबारमध्ये दाखल, अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज
Continues below advertisement
आसनी चक्रीवादळ अंदमान निकोबारमध्ये दाखल झालंय. या वर्षातलं हे पहिलं चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळामुळे अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. चक्रीवादळाची ही स्थिती दोन दिवस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही पावसाळी वातावरण पाहायला मिळतंय. मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. काल पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबईच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या... रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मेघगर्जनेसह हलका पाऊस झाला. दिवसभर हवामान ढगाळ असल्याने वातावरणात काहीसा गारवा होता.
Continues below advertisement