Asani Cyclone : आंध्र प्रदेश, ओडिशावर घोंगावतंय 'असनी' चक्रीवादळ ABP Majha
Continues below advertisement
येत्या आठवड्यात असनी चक्रीवादळ आंध्र प्रदेश, ओडिशात धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळाची निर्मिती झालीय. पुढील १२ तासात असनीची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. १० मे रोजी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. १० मे आणि ११ मे रोजी आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. चक्रीवादळादरम्यान बंगालच्या उपसागरात वाऱ्यांचा वेग ताशी १२५ किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. असनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. तसंच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना परतण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात.
Continues below advertisement