Puja in Masjid : दसऱ्याच्या दिवशी बिदरमधील मदरशामध्ये पूजेचा प्रयत्न? ओवैसींनी व्हिडीओ केला ट्विट

Continues below advertisement

कर्नाटकातील बिदरमधल्या ऐतिहासिक मदरशामध्ये दसऱ्याच्या दिवशी जमावानं पूजा  करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येतोय. या घटनेचा कथित व्हीडिओ एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट केला आहे. या व्हीडिओची एबीपी माझा पुष्टी करत नाही. या घटनेनंतर स्थानिक मुस्लिमांनी आंदोलन केल्याचं सांगण्यात येतं. या भागातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेश नेघन्नावार यांनी सांगितलंय. बिदरमधील ऐतिहासिक मोहम्मद गवान मशिदीच्या मदरशामध्ये हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आलाय. या प्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram