Arvind Kejriwal Health Updated : कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं?

Continues below advertisement

Arvind Kejriwal Health Updated : कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : मद्य विक्री धोरणप्रकरणात अटकेत असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा न्यायालयातील मुक्काम आणखी वाढला आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, दिल्ली हायकोर्टानं (Highcourt) जामिनाच्या निर्णयाला दिलेल्या स्थगिती दिल्याने, त्या विरोधात केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्चात याचिका सादर केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. त्यावेळी, अरविंद केजरीवाल यांनी जामिनाला दिलेल्या स्थगिती प्रकरणी दिल्ली हायकोर्टाच्या अंतिम निर्णयाची वाट पाहावी, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगितले. आता, दिल्ली हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांना धक्का दिला आहे. कारण, ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचा जामीन रद्द केला आहे. त्यातच आज अरविंद केजरीवाल हे कोर्टरुममध्ये असताना त्यांची शुगर लेव्हल खालावली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram