Arvind Kejriwal on Laxmi Ganpati Photo on Note : नोटेवर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी, गणपतीचा फोटो हवा

Continues below advertisement

Arvind Kejriwal on Laxmi Ganpati Photo on Note : गुजरात निवडणुकीआधी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी हिंदुत्वाचं कार्ड खेळत नवी मागणी केलीय. नोटांवर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो लावा, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केलीय. लक्ष्मीपूजन करत असताना आपल्या मनात हा विचार आला, असं केजरीवाल यांनी म्हटलंय. व्यापारीही लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ठेवतात असा दाखला त्यांनी दिला. नोटेच्या दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापावा अशी मागणी केजरीवाल यांनी मोदी सरकारकडे केलीय. देवी-देवतांचा आशीर्वाद राहिला तर प्रयत्नांनाही यश येईल आणि अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल असं केजरीवाल यांनी म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram