Arvind Kejriwal Arrest : अरविंद केजरीवालांना आज PMLA कोर्टात हजर करणार, कोर्टातही सुनावणीची शक्यता

Arvind Kejriwal Arrest : अरविंद केजरीवालांना आज PMLA कोर्टात हजर करणार, कोर्टातही सुनावणीची शक्यता
कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीनं अटक केली. रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आज त्यांना PMLA कोर्टात हजर केलं जाणार आहे. ईडी केजरीवालांच्या जास्तीत जास्त दिवसांच्या रिमांडी मागणी करण्याची शत्यता आहे. तसंच, आम आदमी पक्षाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात देखील सुनावणी होण्याची शक्यता आहे. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना ईडीनं नऊ वेळा समन्स बजावलं. मात्र ते एकदाही चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. दिल्ली हायकोर्टात त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र गुरुवारी हायकोर्टानं त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola