Arvind Kejariwal Update : अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात ईडीने काय युक्तीवाद केला ?

Continues below advertisement

Arvind Kejariwal Update : अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात ईडीने काय युक्तीवाद केला ?  राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक झाल्यानंतर देशभरातून मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) धामधूम सुरु असताना, एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख असलेल्या अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याने, राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.  दिल्लीतील मद्य धोरण (Delhi Liquor Scam) आणि कथित घोटाळाप्रकरणात अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला रात्री 9 च्या सुमारास अटक केली. या अटकेविरुद्ध आम आदमी पक्षाने रातोरात थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र 22 मार्चला केजरीवालांनी सुप्रीम कोर्टातील याचिका मागे घेत, हायकोर्टातच लढण्याची भूमिका घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि दिल्ली सरकार नेमकं चालवणार कोण, ते चालणार कसं हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण अरविंद केजरीवाल हे अटक झालेले आपचे पहिलेच नेते नाहीत, त्यांच्या आधी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह, माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन हे बडे चेहरेही कोठडीत आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram