CDS Bipin Rawat Helicopter Crash : हेलिकॉप्टर कसं, कुठे आणि कधी कोसळलं? पहिला व्हिडीओ

Chopper Crash Ooty:  भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) हेलिकॉप्टर क्रॅश (Army chopper crashe) झालं. महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे चार उच्च अधिकारी होते. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. कर्नाटकातील कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी (Niligiri Katteri) ही दुर्घटना घडली. आर्मी ट्रेनिंग कॅम्पच्या परिसरात हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर, तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली आहे. या हेलिकॉप्टर अपघाताची 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी' करण्यात येणार आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू असल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली. 

हे हेलिकॉप्टर नेमकं कसं दुर्घटनाग्रस्त झालं त्याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या हेलिकॉप्टरमध्ये दहा जण प्रवास करत होते. त्यापैकी तीन जण गंभीर जखमी आहेत. या घटनेची माहिती समजताच जिल्हाधिकारी आणि लष्कराचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी सहा रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि मदतनीस होते अशी माहिती समोर येत आहे. हेलिकॉप्टरचा अपघात झाला तेव्हा त्यात 10 जण होते. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्याला आग लागली.  घटनास्थळी सहा रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola