Sputnik Light : स्फुटनिक लाईट लशीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी, केंद्र सरकारची लशीला मान्यता
देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला असून यापुढेही अशा लाट येत राहणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. भविष्यातील हानी टाळायची असेल तर जलद लसीकरण हा एकच पर्याय सध्या आपल्यासमोर आहे. या संदर्भात आता एक सकारात्मक बातमी आली आहे. रशियामध्ये स्पुटनिक लसीचा आणखी एक प्रकार विकसित केला आहे. स्पुटनिक लाईट असं या लसीचं नाव असून याचा एकच डोस पुरा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यावूर्वी रशियन कंपनीची स्पुटनिक व्ही (Sputnik V) बाजारात उपलब्ध आहे.
Tags :
Corona Vaccine COVID Vaccine Russia Sputnik V Sputnik Vaccine Russian Vaccine Sputnik Light Vaccine Sputnik Light