Apple Company on Work from home : अॅपल कंपनीचा ख्रिसमपूर्वी मोठा निर्णय ABP Majha
कोरोनाकाळात वर्क फ्रॉम होम हा परवलीचा शब्द बनलेला होतो. अनेक कंपन्यांनी यातून आपली नवी वर्किंग स्टाईलही विकसित केली. पण आता अॅपलनं या सर्वावर कळस चढवलाय. अॅपल कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी १००० हजार डॉलर्सचा बोनस देणार आहे. ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावानं अॅपलनं हा पवित्रा घेतल्याचं बोललं जातंय. या आधी कंपनीनं फेब्रुवारी २०२२मध्ये कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यास सांगितलं होतं. मात्र आता हा कालावधी वाढवण्यात आला असून पुढील तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण दरम्यानच्या काळात अॅपलनं बोनसचं गिफ्ट देऊन कर्मचाऱ्यांचा ख्रिसमस गोड केलाय.