Anurag Thakur : आंदोलक कुस्तीपटूंना केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूरांकडून चर्चेचं निमंत्रण
दिल्लीतील आंदोलक कुस्तीपटूंना केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आज दुपारी चर्चेसाठी बोलावलं आहे. या चर्चेमधून तोडगा निघतो का, ते पाहावं लागेल. कारण एक महिन्यांपेक्षा अधिक काळापासून हे आंदोलक धरण्यावर बसलेत. केंद्र सरकारनं आता कुठे जाऊन त्यांची दखल घेतली आहे. दरम्यान, एबीपी नेटवर्कनं आंदोलक कुस्तीपटू साक्षी मलिकशी फोनवरून संपर्क साधला. सरकारनं कुठलाही प्रस्ताव दिला तरी तो आम्हा सर्वांना मान्य झाल्याखेरीज आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका साक्षीनं स्पष्ट केली.