Shaheen Baghमध्ये सीएए विरोधातील आंदोलनात गोळीबार, हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात | ABP Majha

दिल्लीतील जामियामध्ये गोळीबार होऊन आठवडा उलटत नाही तोच शाहीनबागमध्येही आज आंदोलनस्थळी गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शाहीनबागमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात गेल्या दीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. ज्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आलेत, तिथेच आरोपीनं येऊन हवेत गोळीबार केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव कपिल गुर्जर असं आहे. तो दल्लूपुरा गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी कपिलला पकडून सरिता विहार पोलिस ठाण्यात घेऊन गेले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola