NT Rama Rao daughter suicide : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी.रामाराव यांच्या मुलीची आत्महत्या
abp majha web team
Updated at:
02 Aug 2022 08:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी.रामाराव यांच्या धाकट्या मुलीने आत्महत्या केलीय. एनटीआर यांची मुलगी कंथामनेनी उमा माहेश्वरी यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं. रविवारी हैदराबाद इथल्या ज्युबली हिल्स या निवासस्थानी कंथामनेनी यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासानुसार गेल्या काही काळापासून कंथामनेनी या नैराश्यात होत्या. त्याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळतेय.. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. कंथामनेनी या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या वहिनीदेखील होत्या.